Firoj: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा अंतर्गत आज सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी मा. श्री. जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी महोदय सातारा यांचे अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळ सभा संपन्न झाली. सदर सभेमध्ये मा. श्री. विकास बंडगर, प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) सातारा तथा प्रकल्प संचालक आत्मा, सातारा यांनी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) विषयाचा सादरीकरणाद्वारे आढावा दिला. सदर सभेकरिता मा. श्रीमती. भाग्यश्री फरांदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा, वेगवेगळ्या कृषि संलग्न विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख, श्री. विजय माईनकर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा, सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, श्री. फिरोज शेख नोडल अधिकारी उपसंचालक (कृषी व्यवसाय) स्मार्ट सातारा, श्री. शशिकांत घाडगे पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ स्मार्ट सातारा, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव चे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव चे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कालवडे चे शास्त्रज्ञ, प्रकल्प संचालक आत्मा सातारा कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.